• Mon. Apr 28th, 2025

मेट्रो कर्मचाऱ्यांनी केला शेतकऱ्याचा अपमान, मळक्या कपड्यांमुळे प्रवास करण्यास घातली बंदी, व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

Byjantaadmin

Feb 27, 2024

काही महिन्यापूर्वी एका शेतकऱ्याला कार शोरूमधून बाहेर काढल्याची घटना घडली होती. त्यावेळी देशभरात प्रचंड हंगामा झाला होता. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मळके कपडे असल्यामुळे एका शेतकऱ्याला मेट्रोमधून प्रवास करण्यास रोखण्यात आलं. लक्षवेधी बाब म्हणजे या शेतकऱ्याकडे तिकिट होतं. त्याच्याजवळ कुठलंही आक्षेपार्ह सामान नव्हतं. मात्र तो कपड्यांनी गरीब दिसतोय म्हणून त्याला मेट्रो कर्मचाऱ्यांनी रोखलं. शेवटी या मेट्रोमधील प्रवासांनी या कर्मचाऱ्यांसोबत काय केलं हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा प्रचंड भडकले आहेत. (फोटो सौजन्य – @DeepakN172/Twitter)

ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. तर त्याचं झालं असं की, राजाजीनगर मेट्रो स्टेशनवर एका शेतकऱ्याला रोखण्यात आलं. हा शेतकरी मेट्रोनं प्रवास करत होता. त्यानं नियमाप्रमाणे तिकिट काढलं आणि मेट्रोमध्ये चढण्यासाठी तो रांगेत उभा राहिला. पण तेवढ्यात मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्याला रोखलं. कारण त्याचे कपडे मळके होते. तो या मेट्रोनं प्रवास करू शकत नाही असं ते म्हणू लागले. या शेतकऱ्याचं नाव कार्तिक असं होतं. कर्मचाऱ्यांनी त्याचं सामान तपासून पाहिलं. पण त्यामध्ये कुठलीही अनधिकृत वस्तू सापडली नाही. शेवटी कर्मचाऱ्यांचं वर्तन पाहून आसपासचे प्रवाशीच भडकले आणि कर्मचाऱ्यांना सुनावू लागले. या व्यक्तीला का रोखण्यात येतंय? मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी काही खास ड्रेस कोड आहे का? अशा प्रश्नांचा भडिमार करू लागले. शेवटी लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून कर्मचारी मागे हटले आणि त्यांनी या शेतकऱ्याला प्रवास करू दिला. (फोटो सौजन्य – @DeepakN172/Twitter)

शेवटी प्रवासी संतापले अन्…

शेवटी प्रवासी संतापले अन्…

ही संपूर्ण घटना आसपासच्या प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच या कर्मचाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी देखील काही जण करताना दिसत आहेत. असो, या प्रकरणी तुम्हाला काय वाटते? आपले विचार आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed