सोशल मीडियावर वादग्रस्त विधानं करुन प्रकाशझोतात येणारी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा चर्चेत आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर केतकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

केतकी चितळेनं सोशल मीडिया पोस्टवर असं म्हटलंय की, “कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःचा कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले, आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक “महापुरुषांनी” एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले, अशी बातमी ऐकली! जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये.” ।।जय हिंद।। ।।वंदेमातरम्।। ।। भारत माता की जय।।
https://www.facebook.com/plugins/post.php?width=552&height=500&href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FKetaki.Chitale.Official%2Fposts%2F915149853414805%3Fref%3Dembed_post