• Tue. Apr 29th, 2025

सुरसम्राट हरपला! लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Byjantaadmin

Feb 26, 2024

मुंबई– सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टीतून अतिशय दुःखद अशी बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं आज २६ फेब्रुवारी रोजी निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार ते गेली अनेक दिवस आजारी होते. आजारपणामुळे त्यांचा निधन झालं आहे. आज २६ फेब्रुवारी रोजी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते आणि ते कोणालाही भेटत नव्हते. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाबद्दल एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं आहे. यात त्यांनी लिहिलंय, ‘अत्यंत जड अंतःकरणाने, आपल्याला कळवताना दुःख होत आहे की, २६ फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाले. उधास परिवार.’ यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पंकज यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. गेले कित्येक दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं आज सकाळी ११ वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्यांची सिनेसृष्टीतील आणि संगीतातील कारकीर्द ही अतिशय मोठी होती. त्यांच्या गझल, त्यांची अनेक गाणी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. त्यांचं ‘चिठ्ठी आई है’ या गाण्याने तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आज स्वरसम्राट हरपला अशी भावना प्रेक्षक वर्गातून व्यक्त केली जात आहे. त्यांची ‘ना कजरे की धार’, ‘चांदी जैसा रंग’, ‘एक तराफा उसका घर’, ‘मैं नशे मे हू’, ‘मैं पिता नही हू’ यांसारखी अनेक गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होती. त्यांना २००६ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. २६ फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर सिनेसृष्टीतून दुःखद प्रतिक्रिया उमटत आहेत. संगीत क्षेत्रासोबतच बॉलिवूडमधूनही शोक व्यक्त केला जात आहे.मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी गायकावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंकज यांच्या निधनानंतर संगीतसृष्टी पोरकी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed