भा.ई.नगराळे यांनी साधला नागरिकांशी संवाद
चाकुर -शहरातील नवीन बसस्थानका समोर भा.ई.नगराळे आणि मोईजभाई शेख यांचा चाकुर शहर कॉग्रेस पार्टीच्या वतीने शाल,हार घालुन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा राज्य समन्वयक मतदार संपर्क अभियान प्रमुख भा. ई. नगराळे, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटीचे सरचिटणीस शेख मोईजभाई,सध्या लातुर जिल्हा दौऱ्यावर मतदार जनसंपर्क अभियान राबवित आहेत.कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची भूमिका सांगत आहेत.चाकुर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावात बुथ कमिटी स्थापन करुन पक्ष वाढीसाठी सर्वानी काम करावे,येणाऱ्या लोकसभा निवडणूक तोडावर आली असून त्यासाठी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी गावागावातून जाऊन बैठकीचे अयोजन करावे असे आवाहन भा.ई.नगराळे यांनी केले.शहर अध्यक्ष शेख पप्पुभाई,सोशल मिडीया प्रमुख कॉग्रेस पार्टी सलीमभाई तांबोळी,गणी कुरैशी,युसुफ भोकरे,सोमनाथ स्वामी,अझहर शेख,अब्बास शेख,छोटुभाई बागवान,असलम हरणमारे,अकबर पटेल,रमाकांत पाटील,जिरगे,गणपत शिंदे,सिरसाटे मामा,आदिसह काँग्रेसचे पदाधिकारी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थीत होते.
