• Tue. Apr 29th, 2025

मग गृहमंत्रीपद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का?

Byjantaadmin

Feb 26, 2024

नवी दिल्ली : “मनोज जरांगे पाटील यांच्यामागचा बोलवता धनी कोण? हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. हे सर्व घडवणारे कोण आहेत? सरकारचा हिस्सा आहेत का? महाराष्ट्रात अस्थितरता निर्माण करुन वेगळं राजकारण करायच आहे का? हे तुम्हाला माहित नसेल, मग गृहमंत्री तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला. “मनोज जरांगे पाटील यांचे फोन टॅप केले जात असतील, याबाबतीत रश्मी शुक्ला अनुभवी आहेत. त्यासाठी त्यांना बसवलय. रश्मी शुक्ला डीजी यांच्यापेक्षा हे जास्त कोणाला माहिती असेल? गृहमंत्र्यांनी अनुभवी डीजींशी चर्चा करावी. कोण कोणाला फोन करतय? ते आपल्या सरकारमध्ये आहेत का? ते महाराष्ट्राला पेटवायला निघाले आहेत का? ही माहिती नसेल, तर हे राज्याच दुर्देव आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“मनोज जरांगे पाटील सध्या जे बोलतायत, ती भाषा त्यांनी भाजपाकडून घेतली असेल. जरांगे पाटील साधे गावातील कार्यकर्ते आहेत, त्यांच्या भाषेकडे जाऊ नका, भावना समजून घ्या. भाजपामधले सुशिक्षित, कडक इस्त्रीचे नेते, त्यांच्या भाषेकडे लक्ष द्या. एकमेकाला संपवायची, खतम करण्याची भाषा आहे. भाषेची संस्कृती, संस्कार कोणी बिघडवला असेल, तर फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या एका टोळीने बिघडवलाय. फडणवीस यांच्याकडे सूत्र गेल्यानंतर महाराष्ट्राची अवस्था खराब झाली” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

तिघेही मोदींचे फॉलोअर्स

“अजित पवारांनी लिहिलं, विकासासाठी ते मोदींकडे गेले. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना समुद्रात डुबकी मारुन स्कूबा डायव्हींग कराव लागेल. अजित पवार कदाचित धरणात उडी मारतील, तिघेही मोदींचे फॉलोअर्स आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केला.

‘देशावर मोठ संकट असताना मोदी आयुष्याचा आनंद घेतात’

“पुलावामा हल्ला झाला, तेव्हा मोदी जिम कॉर्बेटमध्ये फोटोग्राफीचा आनंद घेत होते. देशात मोठ संकट असतं, तेवहा मोदी संकट सोडवण्याऐवजी आयुष्याचा आनंद घेत असतात. शेतकरी गोळ्या झेलतायत, तेव्हा ते स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेतायत, हाच त्यांचा विकास आहे. राहुल गांधींना तुम्ही बोलता, तुम्हील सांगा तुम्ही काय करताय?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. ‘भाजपात अंतर्गत टोळीयुद्ध सुरु आहे. लवकरच त्याचा भडका उडणार आहे’ असं संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed