लातूर जिल्हा बँक देशात अग्रेसर ; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ .भागवत कराड यांचेकडून जिल्हा बँकेच्या कार्याचे कौतुक
लातूर जिल्हा बँकेच्या नूतन चिखली विस्तारित कक्षाचे उद्घाटन

लातूर,- जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील सर्वागीण विकासासाठी कर्ज पुरवठा करून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देशात नावलौकिक मिळवलेला असून या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शैक्षणीक कर्जापासून ते औद्योगिक प्रकल्पासाठी बँक मदत करेल असा विश्वास भारताचे अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी येथे बोलताना व्यक्त केला ते अहमदपूर तालुक्यातील चिखली येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन विस्तारित कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कराड बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख होते. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा आमदार बाबासाहेब पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार धिरज विलासराव देशमुख, बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, माजी आमदार बब्रुवान खंदाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्याचे अर्थ राज्यमंत्री कराड यांचेकडून उजाळा
यावेळी बोलताना देशाचे अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी तत्कालीन लोकनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मी संभाजीनगर येथे विरोधी पक्षाचा महापौर असताना पक्ष अग्निवेश बाजूला सारून मी लातूरचा असल्याने १६७ कोटी रुपये विकासकामाला दिल्याने ब्रीज संभाजीनगर येथे उभारले गेले हे वेगळ व्यक्तिमत्व असलेले विलासराव देशमुख होते असे सांगुन त्यांच्या कार्याचा उजाळा दिला लोकनेते विलासराव देशमुख यांनी राज्यात अनेक भागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत त्यांचे आज स्मरण करून दिले

सर्वांना मदत करण्याची जिल्हा बँकेची भुमिका-माजी मंत्री दिलीपराव देशमुख
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला आणि सुशिक्षित बेरोजगारांचे हित साधण्याची भूमिका ठेवून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काम करीत आहे. त्याला सभासदांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बँकेने वितरीत केलेय कर्जाची परतफेडही वेळेत होत असल्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.

जिल्हा बँकेकडून बँकिंग सुविधा
जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख यांनी प्रास्ताविकामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाटचालीची माहिती दिली तसेच ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सुविधा पोहचवून त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा बँक कार्यरत आहे. ग्राहक आणि सभासदांना राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणेच सर्व बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बँकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी कार्यक्रमास जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक अँड श्रीपतराव काकडे संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक दिलीप पाटील नागराळकर संचालक जयेश माने संचालक एन आर पाटील संचालक मारोती पांडे संचालक अनुप शेळके संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, श्रीमती लक्ष्मीबाई भोसले सौ सपना कीसवे सौ अनिता केंद्रे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, लातूरच्या माजी उपमहापौर डॉ दीपाताई गीते,अहमदपूर तालुक्यातील विविध संस्थांचे चेअरमन ,सरपंच ग्रामस्थ शेतकरी,सभासद ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी मांडले