(Loksabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात देखील राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणाली सुरुवात केली आहे. 2019 ला शिवसेनेचे ओमराजे निबांळकर हे विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजितसिंह यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षातून अनेकजण इच्छूक आहेत. त्यामुळं कोणाला उमेदवारी मिळणार आणि धाराशिवचा गड जिंकणार हे पाहणं महतवाचं ठरणार आहे. जाणू घेऊयात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आढावा.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ पद्मसिंह पाटील हे केवळ 6 हजार 787 मतांनी निवडून आले होते. डॉ. पाटील यांना 4 लाख 8 हजार 840 तर रवींद्र गायकवाड यांना 4 लाख 2 हजार 53 मते पडली होती. पद्मसिंह पाटील यांना 44.22 टक्के तर रवींद्र गायकवाड यांना 43.49 टक्के मते पडली होती.
2024 च्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी डॉ. पदमसिंह पाटील यांचा 2 लाख 35 हजार 325 मतांनी दारुण पराभव केला. रवींद्र गायकवाड यांना 6 लाख 7 हजार 699 मते तर पद्मसिंह पाटील यांना 3 लाख 73 हजार 374 मते पडली. पदमसिंह पाटील यांना 33 टक्के तर रवींद्र गायकवाड यांना 54 टक्के मते पडली होती. त्यानंतर 2019 मध्ये शिवसेने रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी न देता ओमराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता.
शिवसेनेच्या पाठीमागं उभं राहणारा मतदार यावेळी काय करणार?
धाराशिव जिल्ह्याचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या प्रस्थापित राजकारणाला छेद देत मतदारांनी पहिल्यांदा रवींद्र गायकवाड आणि नंतर ओमराजे निंबाळकर यांना निवडून दिले. बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यामागे थांबणारा मतदार राजकीय फाटाफुटीनंतर कोणाला कौल देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघ सत्ताधारी भाजप लढवणार की मुख्यमंत्री Eknath shinde यांचे समर्थक रिंगणात उतरणार हे ठरलेले नाही. अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी तेरणा साखर कारखान्याच्या परिसरात सभा घेऊन या मतदारसंघावर ताबा सांगितला आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, प्राध्यापक रवींद्र गायकवाड पुन्हा आपण सज्ज असल्याचे सांगू लागलेत. या निवडणुकीत धाराशिवचा लढा (शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) अशी होण्याची शक्यता वर्तविली जातेय.
भाजप पुन्हा राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी देणार का?
नव्या राजकीय फाटाफुटीनंतर धाराशिव जिल्ह्यातील मतदार कोणाला कौल देणार हा चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, परांडा तालुक्यात भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून धाराशिवच्या राजकारणात उतरणारे तानाजी सावंत सध्या जिल्ह्यात राजकीय गणितांची मांडणी करत आहेत. अशा स्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला उतरायचे असेल तर राणा जगजीतसिंह पाटील यांच्याशिवाय भाजपमध्ये फारसे तगडे उमेदार नाहीत. या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास sambhaji nagar मधील भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे हेदेखील इच्छूक आहेत. गेल्या सहा महिन्यापासून गावोगावी सभा घेत आहेत. लिंगायत मतांचा प्रभाव असल्यानं पुढे जाता येईल, अशी मांडणी त्यांचे समर्थक करतात. पण याच गावातील काँग्रेसचे मोठे नेते बसवराज पाटील यांना भाजपमध्ये घेऊन नवी गणिते मांडता येतात का? याचीही चाचपणी भाजप नेते करत आहेत.
शिवसेना फुटीनंतर ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील ठाकरेंसोबत
शिवसेनेतील फाटाफुटीनंतर खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येनंतर ओम राजेनिंबाळकर हे राणा जगजीतसिंह पाटील यांच्या विरोधातच उभे राहणार हे मतदारसंघात सर्वांना माहीत आहे. आमदार कैलास पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याची भूमिका घेतल्याने या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतही रंगत येण्याची शक्यता आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ओम राजेनिंबाळकरांनी त्यांचा जनसंपर्क वाढवला आहे. दूरध्वनीवर प्रतिसाद देणारा अशी त्यांची ओळख आहे. उद्धव ठाकरे गटाचे राज्य स्तरावर ठरलेल्या कार्यक्रमापेक्षाही जिल्ह्यातील समस्या आणि त्यातून निर्माण होणारा रोष याच्या एकत्रिकरणावर ओम राजेनिंबाळकर भर देत आहेत.
कोणत्या तालुक्यात कोणाचं वर्चस्व?
dharashiv लोकसभा मतदारसंघात सहा तालुके आहेत. यामध्ये औसा, उमरगा , तुळजापूर, उस्मानाबाद, परांडा आणि बार्शी या तालुक्यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यु दत्तात्रय पवार हे औसा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तर ज्ञानराज धोंडिराम चौगुले (शिवसेना शिंदे गटाचे) हे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राणाजगजितसिंग पद्मसिंह पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेचे कैलास बाळासाहेब पाटील (घाडगे) हे osmanabad विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तानाजी जयवंत सावंत ((शिवसेना शिंदे गट) हे परांडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राजेंद्र विठ्ठल राऊत हे बार्शी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत.