shivsena शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. परंतु आता मोठ्या कौतुकाने केलेल्या वक्यव्यानंतर संजय गायकवाड अडचणीत आले आहेत. शिवजंयतीच्या दिवशी संजय गायकवाड यांनी स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखातीत आपण १९९७ मध्ये वाघाची शिकार केली होती. त्याच्या दात गळ्यात बांधला आहे. बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो, असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. संजय गायकवाड यांची ही मुलाखत व्हायरल झाली. मग वनविभागाला जाग आली. त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय म्हणाले संजय गायकवाड
आमदार गायकवाड यांनी बुलढाणा शहरात शिवजयंती कार्यक्रमला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांना गळ्यात असणाऱ्या वाघाच्या दातासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. आमदार संजय गायकवाड यांनी राजेशाही थाटात कौतुकाने उत्तर दिले. ते म्हणाले, माझ्या गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात आहे. त्या वाघाची १९८७ मध्ये मी शिकार केली होती. मुलाखत घेणाऱ्या पुन्हा विचारले वाघ होता की बिबट्या मग पुन्हा गायकवाड म्हणाले, वाघच…बिबट्या वगैरे तर मी असेच पळवतो.