गुजरातमध्ये भाजप ऐतिहासिक विजय नोंदवताना दिसत आहे. मतमोजणीच्या कलानुसार, भाजपने 182 पैकी 149 जागांवर आघाडी घेतली असून 6 जागा जिंकल्या आहेत. या ट्रेंडचे निकालात रूपांतर झाल्यास भाजप 1958 मधील काँग्रेसचा सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम मोडेल.
गुजरातमध्ये 1985च्या विधानसभा निवडणुकीत माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 149 जागा जिंकल्या होत्या. 150चा आकडा पार केल्यावर भाजप आपल्या विजयाचा नवा विक्रम मापदंड तयार करेल, तसेच काँग्रेसच्या विजयाचा विक्रम मोडेल.
भाजपचा आकडा 150 पार, काँग्रेस 20च्या आत
गुजरातमधील एकूण 182 जागांच्या ट्रेंडमध्ये भाजप एकतर्फी लीड घेत 155 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 15 आणि आम आदमी पार्टी 7 जागांवर आघाडीवर आहे. येथे 4 जागा अपक्ष आणि इतर उमेदवारांच्या खात्यात जात आहेत. गुजरातमध्ये आज सकाळी 8 वाजल्यापासून अर्ध्या तासात पोस्टल मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर EVMवरून मतमोजणी सुरू झाली.
जामनगरमधून भाजपच्या रिवाबा, अहमदाबादमधून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, विरमगाममधून भाजपचे हार्दिक पटेल मोठ्या जागांवर आघाडीवर आहेत. भाजपची आघाडी पाहून पक्ष समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इशुदान गढवीही आघाडीवर आहेत.