• Tue. Apr 29th, 2025

राज्यपाल पुन्हा अडचणीत? मॉडेलचे राजभवनातले फोटो व्हायरल

Byjantaadmin

Dec 8, 2022

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या विधानांवरुन ते वाद ओढवून घेत आहेत. आता पुन्हा एकदा कोश्यारी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण ठरली आहे एक मॉडेल.

या मॉ़डेलचे राजभवनातले फोटो समोर आले असून त्यावरून मनसेने आक्षेप घेतला आहे. मायरा मिश्रा या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत तसंच राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावरुन मनसेने राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत.

मनसे नेते मनोज चव्हाण यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, “ठिकाण राजभवन – ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही?” या ट्वीटनंतर आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed