मंगेशकर महाविद्यालयात संत गाडगेबाबा आणि संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी
औराद शहाजानी: येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा आणि संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी संत गाडगेबाबा आणि संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस महाविद्यालयातील स्वच्छता कर्मचारी विजय बाबछडे आणि विद्यार्थीनी शुभांगी कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ.आनंद मुसळे यांनी संत गाडगेबाबा व संत रोहिदास महाराज यांच्या जीवन व कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याचबरोबर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, डॉ.जाफर चौधरी, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.विनोद जाधव, डॉ.आनंद मुसळे, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.