वाशिम : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झालं. वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे आमदार होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. परंतु मुंबई येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने राजेंद्र पाटणी यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. पाटणींच्या निधनाने भाजपसह राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे.

राजेंद्र पाटणी हे १९९७ ते २००३ या काळात शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार होते. त्यानंतर २००४ (शिवसेनेकडून), तर २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपकडून असे तीन वेळा कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पाटणींच्या निधनाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
राजेंद्र पाटणी यांची कारकीर्द
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळख
पूर्वी शिवसेनेकडून विधान परिषद आणि विधानसभेत प्रतिनिधित्व.
१९९७ ते २००३ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत शिवसेनेकडून प्रतिनिधित्व.
२००४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर कारंजातून विजयी,
२००९ मध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके यांच्याकडून पराभव
२०१४ मध्ये भाजपात प्रवेश.
२०१४ व २०१९ भाजपकडून कारंजा विधानसभेतून विजयी.
भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य.
अभ्यासू,अत्यंत मृदू स्वभावी व जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान असलेले नेते म्हणून परिचित.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा झटका.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदरांजली
अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.