बाबुराव माने यांचे निधन
जेवरी,ता.निलंगा,जिल्हा लातूर येथील रहिवाशी आणि निवृत्त एस.पी.,राष्ट्रपती पुरस्कार विजेते बाबुराव रखमाजी माने (बी.आर.माने) यांचे वयाच्या 90 व्या वर्षी दीर्घ आजाराने जेवरी येथील राहत्या घरी निधन झाले..एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांचा एसआरपी मध्ये नावलौकिक होता..ते उत्कृष्ट व्हॉलीबॉल पट्टू होते..गेल्या वर्षभरापासून ते आजारी असल्याने त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती..अखेर आज रात्री १०वाजून 20 मिनिटाने त्यांची प्राणज्योत मालवली..त्यांच्या पश्चात 3 मुले मुलगी, स्नुषा, नातवंडे ,पतवंडे असा परिवार आहे..ज्येष्ठ नेते सुनील माने यांचे ते वडील आहेत.. दिनांक 20 फेब्रुवारी २०२४ रोजी २.०० वाजता त्यांच्यावर जेवरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .
