• Wed. Apr 30th, 2025

“राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते महायुतीत सामील होतील”, काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या नेत्याचा मोठा दावा

Byjantaadmin

Feb 21, 2024

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षबदलाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं असून महाविकास आघाडीतील अनेक नेतेही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. येत्या काळात राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपा किंवा भाजपा संलग्न पक्षात सामील होतील, असा दावा त्यांनी केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.“मागच्या दहा वर्षांत जे जे कोणी विरोधी पक्षनेते होते, त्यांनी भाजपा किंवा भाजपा संलग्नित होऊन राजकारण करण्याचं ठरवलं आहे. येणाऱ्या काही दिवसांत महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपामध्ये आणि महायुतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही”, असा मोठा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेत्यांचा ट्रेंड कायम राहील

“सुरुवातीच्या काळात २०१४ साली eknath shinde विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते, ते भाजपात आले. काही कालावधीसाठी अजित दादा विरोधी पक्षनेते होते. तेही महायुतीत आले. ही श्रृंखला पुढे चालेल”, असं संकेतही त्यांनी दिले. तसंच, विरोधी पक्षनेत्यांचा ट्रेंड यापुढेही सुरु राहणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आहेत, तर विधान परिषदेचे विरोधी ambadas danve पक्षनेते ठाकरे गटाचेआहेत. आशिष देशमुखांनी केलेल्या दाव्यानुसार विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवेही महायुतीत सामिल होतात का, हे पाहावं लागणार आहे.

अशोक चव्हाणांबाबतचा दावा ठरला होता खरा

महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये हजेरी लावणारा एक मोठा नेता लवकरच भाजपात सामील होणार, असा दावा आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतरsashok chavan भाजपावासी झाले. आशिष देशमुखांचा दावा खरा ठरल्याने आता विरोधी पक्षनेत्याबाबत त्यांनी केलेलं विधानही खरं ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *