उडाण उपक्रमास लातूरच्या युवक-युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद
विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि मेट्रोपोलीस फाऊंडेशनच्या माध्यमातून सौ. अदिती अमित देशमुख यांचा अभिनव उपक्रम
लातूर (प्रतिनिधी): विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि मेट्रोपोलीस फाऊंडेशनच्या संयुक्त विदयमाने उडाण हा अभिनव प्रकल्प गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. या
प्रकल्पाच्या माध्यमातून युवक, युवतींना स्वंयरोजगार निर्माण व्हावा, त्याचा व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि भविष्यात त्यांना विविध क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करता यावे यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या प्रकल्पातून देण्यात येत आहे. हा उडाण प्रकल्प ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका सौ.अदिती अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून राबविला जात
आहे. लातूरच्या युवकयुवतींचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
उडाण प्रकल्प अंतर्गत सौ. अदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरातील होतकरू व गरजू युवक आणि युवतींना सेल्फ डिफेन्स, रिटेल सेल्स असोसिएट, इंग्लिश स्पोकन या तीन क्षेत्रातील त्यांना प्रशिक्षण कोर्स मोफत उपलब्ध करून दिले आहेत. उडाण उपक्रमातून लातूर शहर व ग्रामीण भागातील वेगवेगळया आठ ठिकाणी हे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ग्रामीण भागामधील हरंगुळ खुर्द, महापूर, कातपुर रोड व लातूर शहरातील गवळी गल्ली,
पाच नंबर चौक, दयानंद कॉलेज गेट, गणेश चौक या ठिकाणी सर्व मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणासाठी लातूर तालुक्यातील एकूण 258 युवक आणि 521 युवती असे एकूण 779 युवक-युवती यांनी आपला प्रवेश नोंदवीला आहे. या ठिकाणी त्यांना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी लोक प्रशिक्षण देत आहेत आणि आवश्यक मार्गदर्शन करीत आहेत..
या उपक्रमांच्या आयोजनासाठी संस्थेच्या समन्वयक संगीता मोळवणे, प्रकल्प समनव्यक अविनाश देशमुख, खुंदमीर करपुडे, सोशल प्लॅनर गजानन बोयणे, सोमनाथ
कावळे, मेघराज देशमुख आदी परिश्रम घेत आहेत.