सिरसी वाडी येथे शिवजयंती उत्साहात संपन्न.
निलंगा: तालुक्यातील सिरसी वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती विवीध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिरसी वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच संगमाबाई मंडले यांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपसरपंच राहुल पंडित मंडले, ग्रामसेवक दिलिप मुळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी न्युज 1 इंडियाचे लातूर जिल्हा प्रतिनिधि किशोर सोनकांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा लेखा जोखा मांडत मार्गदर्शन केले व त्यांच्या विचारांना उजाळा दिला. यावेळी गावातील महेश मंडले, नामदेव मंडले यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी होते.
