मुंबई (सायन, प्रतिनिधी-प्रणाली निमजे)

पीएचके नमस्कार सेवा, मुंबई या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील शीव (सायन) माध्यमिक शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून गणित व विज्ञान या विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक भिकन सोनवणे, निवासराव शेवाळे, संजय गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७.०२.२०२४, दि.२०.०२.२०२४ आणि दि. २१.०२.२०२४ या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असुन दहावीच्या विद्यार्थ्यांना या व्याख्यानाच्या माध्यमातून चांगलाच फायदा होईल अशी ग्वाही शीव (सायन) माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक कर्मचारी गण यांनी दिली असुन पीएचके नमस्कार सेवा, मुंबई. या सेवाभावी संस्थेने दहावी विद्यार्थ्यांच्या प्रती आपले मोलाचे योगदान दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतील आणि आपल्या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागेल असं वक्तव्य करून विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले. याप्रसंगी संस्थेचे सभासद हर्षदजी आचार्य, खलीलजी शिरगावकर, आणि त्यांचे सहकारी अनिकेतजी गावडे – ब्रांच मॅनेजर, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, श्रीकांतजी माळवे – सेल्स मॅनेजर, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आदी मान्यवर उपस्थित होते.