निलंगा येथे दोन बसच्या काचा फोडल्या
निलंगा:-शहरापासून लातूर रस्त्यावर मंगल कार्यालय जवळ कर्नाटक च्या बिदर जिल्ह्यातील बस लातुर हुन भालकी कडे जाणारी भालकी आगाराची बस क्रमांक KA 38 F 1221 व निलंगाआगाराची बस क्रमांक MH 20 BL 2544 व निलंगा किल्लारी मार्गावर दगड मारून दोन बसच्या समोरील काचा फोडल्या. अज्ञात आंदोलकानी बसच्या समोरच्या काचा फोडून, पळून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत निलंगा बस स्थानक व्यवस्थापकानी निलंगा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सदरील अज्ञात आंदोलकावर गुन्हा दाखल करण्यात आहे. कर्नाटकातील भालकी व महाराष्ट्रातील निलंगा डेपोच्या दोन बस आहेत. आज दुपारी ४ वाजता अज्ञात चार ते पाच जणांनी बसला दगड मारून, समोरील काचा फोडल्या. या घटनेने शासनाचे नुकसान केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निलंगा पोलिस करत आहेत.
