“महविकास आघाडीचे लोकसभेच्या 39 जांगावर एकमत झालं आहे. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल. शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. KOLHAPURकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल”, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी ते सहमत आहेत. ते राजकीय पक्षात सामील झालेलं त्यांना पाहिलेलं नाही, असं शाहू महाराज यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी शाहू महाराज यांनी न्यू पॅलेस येथे भेट घेतली यावेळी ते बोलत होते.
महायुतीला शरद पवारांचा उपरोधित टोला
शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झालं आहे. दोन ते तीन जागांबद्दल खलबत्त सुरू आहेत मी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ. भाजप देशात 400 पेक्षा जास्त आणि राज्यात 40 पेक्षा जास्त जागा सांगत आहे. मला वाटतं हे खूप कमी आकडे सांगत आहेत, असा उपरोधित टोलाही शरद पवारांनी लगावला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, येथे शिवछत्रपतींचा पुतळा होता. तो पुतळा शाहू महाराजांनी बसवला होता. कालच्या कार्यक्रमाला मालोजीराजे आणि शाहू महाराज येणार होते. मात्र ते येऊ शकले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी मी कोल्हापुरात कार्यक्रमात येणार होतो. त्यावेळी त्यांची भेट घ्यावी, असं मी म्हणालो. मी ठरवलं की काल त्यांची भेट झाली नाही. तर आज कोल्हापुरात आलो तर भेट घ्यावी.
मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले शरद पवार ?
आम्हा लोकांचे सरकार होते. ते उच्च न्यायालयात गेले.DEVENDRA FADNVIS यांच्या काळात मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, असे शरद पवार मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना म्हणाले. ज्यांनी मराठा आरक्षणाबाबत सुरु केला. ते उद्या याबाबत बोलणार आहेत. त्यामुळे ते बोलल्यानंतरच मी त्याबाबत माझे मत मांडेल, असे शरद पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.