विलास साखर कारखाना युनीट २ चे
एका दिवसात विक्रमी ३ हजार ९३६ मे. टन ऊसाचे गाळ
लातूर (प्रतिनिधी) :तोंडार, ता. उदगीर येथील विलास सहकारी साखर कारखाना ली., युनीट – २ येथे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी चालू गळीत
हंगाम अधिकाधिक कार्यक्षमतेने चालवून ऊसाचे गतीने गाळप सुरू आहे. या गळीत हंगामात सोमवार दि. ५ डीसेंबर २०२२ रोजी आजपर्यंतच्या कारखाना वाटचालीतील एका दिवसात ३ हजार ९३६ मे. टन ऊसाचे सर्वोच्च गाळप करून प्रतिदिन
सर्वांधिक गाळपाचा विक्रम केला आहे.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखानाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. तोंडार येथील युनीट – २ परीपूर्ण साखर संकूल करण्यासाठी उपपदार्थ प्रक्रीया उदयोग येथे सुरू करण्यात येत आहेत. या अनुषंगाने आसवनी प्रकल्प उभारणीचे कामकाज सुरू आहे. तसेच सभासदाच्या
ऊसाचे वेळेवर गाळप व्हावे यादृष्टीने ऊसतोडणी यांत्रीकीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे.
लातूर जिल्हयातील उदगीरसह जळकोट, चाकूर, शिरुर ताजबंद व अहमदपुर येथील शेतकरी व ऊसउत्पादकांच्या ऊसाचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि प्रगतीसाठी महत्वाचा असलेला तोंडार येथील विलास साखर कारखाना युनीट – २
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवारात आल्या पासून तेथील ऊस गाळपाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार
धिरज विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदशानाने हा कारखाना अत्यंत चांगला चालत आहे. विलास साखर कारखानायुनीट – २ ने गत हंगाम हंगामात कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप केले, तसेच सर्वांधिक ऊसदर देण्याची परंपरा निर्माण केली.
या अगोदरच्या गळीत हंगाम प्रमाणेच सन – २०२२ गळीत हंगामामध्ये देखील ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. यादृष्टीने विचार करून प्रारंभी पासूनच हंगामाची तयारी करण्यात आली. याकरीता आवश्यक तोडणी
वाहतूक यंत्रणेचे व हार्वेस्टरचे करार पुर्ण करण्यात आले. कारखाना हंगामात पुर्ण क्षमतेने चालवण्याच्या दृष्टीने कारखाना मेन्टेनन्स काम केली. गळीत हंगामात सुरू झाले नंतर तांत्रीक अडचण येऊ नये याचा विचार करून कारखाना गाळप क्षमतेचा पूर्ण वापर करून ऊसाचे गाळप करण्यात येत आहे.
यामुळे गळीत हंगामात सोमवार दि. ५ डीसेंबर २०२२ रोजी कारखाना वाटचालीतील एका दिवसात ३ हजार ३ हजार ९३६ मे. टन ऊसाचे सर्वोच्च गाळप झाले असून प्रतिदिन सर्वांधिक गाळपाचा हा विक्रम झाला आहे. कारखान्याची प्रतिदिन
गाळात क्षमता २५०० मॅट्रिक टन एवढी आहे. आज अखेर ८८ हजार ५७० मे. टन ऊसाचे गाळप झाले असून ९० हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक ए.आर.पवार यांनी दिली.
गळीत हंगामात कारखाना वाटचालीतील एका दिवसात ३ हजार ९४० मे. टन ऊसाचे सर्वोच्च गाळप करून प्रतिदिन सर्वांधिक गाळपाचा विक्रम केला, या बददल व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, विलास साखर युनीट २ चे कार्यकारी
संचालक ए.आर.पवार, सर्व संचालक, ऊसउत्पादक, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, तोंडणी – वाहतूक ठेकेदार यांचे राज्याचे माजी वैद्यकीयशिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार, संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.