महाराष्ट्र महाविद्यालयातील एन सी सी विभागाला कर्नल हेमंत जोशी यांची भेट.
निलंगा:-महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर येथील कमांडिंग ऑफिसर कर्नल हेमंत जोशी, एडमिन ऑफिसर डेप्युटी कर्नल एन. पी. सिंग, सुभेदार शेखर थोरात, नायब सुभेदार विष्णू कच्छवे व हवालदार शिवशंकर निकम यांनी भेट दिली.

यावेळी महाविद्यालयातील एनसीसी चे 25 मुले व 20मुली असे मिळून 45 कॅडेट्स उपस्थित होते. कर्नल जोशी व सिंग यांनी एनसीसी कॅडेट्सी संवाद साधत एनसीसी मध्ये असलेल्या संधी विषयी मार्गदर्शन केले. तसेच मुलींच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले व जास्तीत जास्त मुलींनी एनसीसी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. या भेटीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने कर्नल जोशी व सिंग यांचा प्राचार्य डॉ. एम . एन. कोलपुके यांनी सत्कार केला. याप्रसंगी मेजर डॉ.सी. जे. कदम, डॉ. व्ही.पी सांडूर व डॉ. एस. पी. बसुदे उपस्थित होते.