महाराष्ट्र महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गिताच्या सामुहिक गायनाने करण्यात आली. अभिवादन कार्यक्रमासाठी डॉ. भास्कर गायकवाड डॉ. बालाजी गायकवाड, डॉ. सूर्यकांत वाकळे, डॉ. नरेश पिनमकर, महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.