बंजारा समाजाची गौरवशाली परंपरा कायम राहावी संत सेवालाल जयंतीनिमित्त अमित विलासराव देशमुख यांच्याकडून अभिवादन
लातूर प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज गुरुवार दि.१५ फेब्रुवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी साजऱ्या होत असलेल्या संत सेवालाल महाराज जयंती उत्सवास भेट देऊन संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करून या जयंती उत्सव आयोजनाबद्दल जयंती उत्सव समितीचे कौतुक केले. पर्यावरण रक्षणाची शिकवण देणारे थोर संत सेवालाल महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. समाज बांधवांची भाषा इतकी गोड की याच भाषेत समाज बांधवांनी यापुढे आपल्याशी संवाद साधत राहावा असे म्हणत स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याला उजाळा दिला. बंजारा समाजाची गौरवशाली परंपरा कायम राहावी यासाठी आणि समाज बांधवांला पुढे नेण्यासाठी आपण कायम कटिबद्ध राहू असे असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शेवटी त्यांनी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी लातुर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड.किरण जाधव,ट्वेन्टी वन शुगर्स व्हा.चेअरमन विजय देशमुख, ॲड. दीपक सुळ, अभिजित इगे, अकबर माडजे, संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीचे पवन जाधव, अजय चव्हाण, ऋषी जाधव, सुरज चव्हाण यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतिकारी सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक आयोजित समारंभास उपस्थित राहून सदगुरू सेवालाल महाराज यांना अभिवादन केले. त्यांचे कार्य आणि विचार आपल्या सर्वांसाठी कायम अनुकरणीय आणि प्रेरणादायी असल्याचे यावेळी बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.

