: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या जागेवर तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याचे सांगत पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिमी चक्रवर्ती जादवपूर मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.

मिमी चक्रवर्ती बंगाली इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. मिमी यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1989 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. मिमी चक्रवर्तीने 2012 मध्ये चॅम्पियन या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बंगाली इंडस्ट्रीत त्यांनी 25 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिमी यांची लोकप्रियता पाहता 2019 मध्ये टीएमसीने त्यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणूक जिंकत जादवपूर मतदारसंघातून खासदार झाल्या.मिमी यांनी त्या आपल्या जागेवर टीएमसीच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याचे सांगितले आहे . लोकसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सादर न केल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांनी आपला निर्णय नुसता जाहीर केला आहे. याला औपचारिक राजीनामा मानला जाणार नाही.
.