जागतिक एड्स दिनानिमिताने रॅली द्वारे जनजागृती
निलंगा:-महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा व उपजिल्हा रुग्णालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त निलंगा शहरामध्ये रॅली काढून जनजागरण करण्यात आले.
या रॅली ला प्राचार्य डॉ .भागवत पौळ सर व प्राचार्य डॉ .सिध्देश्वर पाटील सर व डॉ .बसुदे मॅडम उपजिल्हा रुग्णालय यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅली ची सुरूवात केली.
ही रॅली यशस्वी करण्यासाठी प्रा .गरड सर, प्रा .हानपुडे सर, प्रा. परवेज शेख व प्रा. सुजित पवार सर यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यायातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी रॅली मध्ये सहभागी झाले.