• Sat. May 3rd, 2025

काँग्रेसकडून आणखी सहा दिग्गजांना राज्यसभेची उमेदवारी

Byjantaadmin

Feb 14, 2024

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आज दिवसभरात दहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सकाळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजस्थानमधून तर चंद्रकांत हंडोरे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर करण्यात आला. आता आणकी सहा दिग्गजांची नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.काँग्रेसकडून सकाळी सोनिया गांधी व हंडोरे यांच्यासह हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनु सिंघवी व बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंह यांना उमेदवारी जाहीर केली होती. सोनिया गांधी यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. सध्या त्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. मात्र, यावेळी त्या निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.आणखी सहा दिग्गजांना काँग्रेसनं मैदानात उतरवलं आहे. त्यामध्ये राष्ट्रीय खजिनदार अजय माकन (Ajay Maken), डॉ. सईत नासीर हुसेन आणि जी. सी. चंद्रशेखर यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशातून अशोक सिंह उमेदवार असतील. माजी मंत्री रेणुका चौधरी यांना तेलंगणातून संधी देण्यात आली आहे. तेलंगणा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुमार यादव यांनाही रिंगणात उतवण्यात आलं आहे.दरम्यान, भाजपने महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चव्हाण यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना लगेच उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी संधी देण्यात आली आहे. त्यांनीही काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

निवडणूक बिनविरोध होणार?

महाराष्ट्रामध्ये सहा जागा असून ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत भाजपकडून तीन, शिवसेना व काँग्रेसकडून प्रत्येकी एक उमेदवार घोषित करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. मैदानात केवळ सहा उमेदवार राहिल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल, असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *