मुंबई : “जलयुक्त शिवार 2 ही योजना आपण सुरु केली आहे. जल हेच जीवन आहे, ज्या-ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळेस जलसंधारणाची महती काय हे लक्षात येतं. जेव्हापासून जलयुक्त शिवारची काम केलीत, तेव्हापासून दुष्काळाच्या काळात लोकांना काही प्रमाणात दिलासा देऊ शकलोय. हे जलरथ जलसाक्षरता करणार आहेत. केंद्राच्या, राज्याच्या योजना “जलयुक्त शिवार 2 च्या योजना या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत, त्या बद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ज्या काही घटना घडलेल्या आहेत, या व्यक्तीगत वैमनस्यातून घडलेल्या आहेत. त्याची गंभीरता मी नाकारत नाही. पण याचा कायदा-सुव्यवस्थेशी संबंध जोडणं चुकीच आहे. दोन-तीन घटनांमध्ये त्यांची व्यक्तीगत भांडण, व्यवहार आहेत. आम्ही यामध्ये कठोर कारवाई करुच”
विनाकारण जे गोपीचंद, जग्गा जासूस तयार झालेत, त्यांनी….
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात एक महिला आणि पुरुष प्रवक्त्याचा हात आहे, त्यामुळे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विजय वेडट्टीवार यांनी केलीय. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विजय वडेट्टीवार यांना काही माहित नसतं. ते सनसनाटी गोष्टी बोलत असतात. विनाकारण जे गोपीचंद, जग्गा जासूस तयार झालेत, त्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे”
ईश्वराकडे मी एवढीच प्रार्थना करीन, गेट वेल सून
सरकार गुंडांच्या मागे उभ राहिल्यास खून-खराबे वाढतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलं. “त्यांची भाषा आणि शब्द पाहिल्यानंतर माझ ठाम मत झालय, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय. मी एवढच म्हणीन गेट वेल सून. मी त्याच्या वक्तव्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. ईश्वराकडे मी एवढीच प्रार्थना करीन, गेट वेल सून”