अनिल गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महाराष्ट्राला अच्छे दिन येण्यासाठी भाजपने कुठल्याही परिस्थितीत शिंदे-पवार-फडणवीस यांच्या नेतृत्वात अजिबात बदल करू नये व हे त्रिकुट महाराष्ट्राच्या सत्तेत असेल तरच, भविष्यात महाराष्ट्राला चांगले दिवस येतील असा देखील टोला लगावला आहे.आता फक्त विधानसभेत गोळीबार व्हायचा राहिलाय, तेवढा करून टाकाच असा टोला धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या गोळीबार प्रकरणावर राज्य सरकारवर लावला.

गोटे यांनी पत्रकाच्या माध्यमातून महायुती सरकारवर टीका टिप्पणी केली.गाेेटे पुढे लिहितात भाजप मध्ये रिक्त जागावरून गुंडाची भरती केली गेली आहे. प्रवेशासाठी गुंड वेटींग लिस्टवर आहेत. महाराष्ट्राला अच्छे दिन येण्याकरीता इतकी चांगली परिस्थिती भविष्यात निर्माण होऊच शकत नाही असे देखील गोटे यांनी नमूद केले. एकंदरीतच भाजप सेना राष्ट्रवादीच्या महायुतीवर गोळीबार प्रकरणावरून निशाणा साधला आहे.