नार्कोटिक कन्ट्रोल ब्यूरोचे झोनल संचालक समीर वानखेडे सर्वांनी परिचित आहेत. त्यांनी २०२१ मध्ये एका क्रूझवर ड्रग्जची पार्टी सुरू असल्याचा दावा करत कारवाई केली होती. आणि या प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात अनेक घडामोडी घडत गेल्या. पण या एक मोठा ट्विस्ट आला आहे.
समीर वानखेडे यांच्या संदर्भात आता एक मोठी बातमी आहे. ईडीने समीर वानखेडेंविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर ईडीने NCB च्या तीन अधिकाऱ्यांना समन्स देखील बजावले आहे. त्यामुळे लवकरच या तीन अधिकाऱ्यांचीही चौकशी होईल.3 ऑक्टोबर 2021 रोजी तत्कालीन नार्कोटिक कन्ट्रोल ब्यूरोचे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी मुंबईलगत एका क्रूझवर छापा टाकत एक ड्रग्ज पार्टी उधळून लावली होती. यात आर्यन खानला अटक केली होती. आर्यन हा बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान यांचा मुलगा आहे. त्यामुळे या प्रकरणाची देशात चर्चा होती.आर्यनला अटक झाल्यानंतर बॉलिवूड कसा ड्रग्जच्या विळख्यात आहे, याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. तसेच आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्या संदर्भातील अनेक सुरस कथांची चर्चा होत होती. अखेर 28 ऑक्टोबरला आर्यन खानला जामीन मंजूर झाला आणि 30 ऑक्टोबर 2021 रोजी तो तुरुंगातून बाहेर आला. तब्बल 22 दिवस आर्यन तुरुंगात होत.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयने आणि ईडीनेही केला. कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनने 22 तुरुंगवास भोगल्यानंतर कालांतराने त्याला क्लीन चीट देखील देण्यात आली.या क्रूज ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावी आणि त्याचा साथीदार सॅम डिसूजा यांनी आर्यनला सोडवण्यासाठी शाहरुख खानच्या कुटुंबाकडून 18 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होता. शिवाय त्यातील 50 लाख रुपये घेतल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच हे पैसे नंतर परत केल्याचेही FIR मध्ये नमूद केले आहे.अखेर या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आत हायकोर्ट वानखेडेंना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.