लोकल ट्रेन किंवा बसमध्ये अनेकदा पुरूष मंडळी सीटसाठी हाणामारी करताना दिसतात. काही वेळा तर एका व्यक्तीला दोन चार जणं मिळून बुकलताना दिसतात. असे अनेक व्हायरल व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण हाणामारीच्या बाबतीत देशातील महिला देखील काही कमी नाही. त्या देखील पुरुषांप्रमाणेच बसमध्ये हाणामारी करताना दिसत आहेत. एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. या व्हिडीओमधील महिला चालत्या बसमध्ये एकमेकांना चक्क चपलेलं मारताना दिसत आहे. शिवीगाळ करत त्या एकमेकांना अक्षरश: बुकलून काढताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल. (फोटो सौजन्य – @gharkekalesh/Twitter)

ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. BMTC बसमधून प्रवास करणाऱ्या २ महिलांचं खिडकीवरून भांडण झालं. कोणी किती खिडकी सरकवायची यावरून त्या दोघी भाडत होत्या. हळूहळू या भांडणानं रौद्र रुप धारण केलं. दोघंही एकमेकांना शिवीगाळ करू लागल्या. पुढे अर्थातच या शिव्यांमुळे भांडण आणखी वाढलं अन् त्या दोघींमध्ये हाणामारी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे दोघंही एकमेकांना अक्षरश: चपलेनं मारत होत्या. दरम्यान इतर प्रवाशांनी मध्ये पडून त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिला काही ऐकायला तयार नव्हत्या.
Slipper-Kalesh b/w Two women Inside BMTC bus over Sliding the Glass , Bengaluru
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 8, 2024
pic.twitter.com/sBQA9oqOly
हा व्हिडीओ @gharkekalesh या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ८७ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओवर हजारो नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतायेत, या महिला लहान मुलांसारख्या भांडतायेत त्यांना दिल्लीमधील हाणामारी दाखवा मोटिव्हेशन मिळेल, तर कोणी म्हणतेय, माणसानं एकमेकांचा आदर करायला हवा.