सुदर्शन न्यूज चे संपादक सुरेश चव्हाणके यांचा निलंग्यात जोडे मारून निषेध
निलंगा (प्रतिनिधी):- प्रथम स्वतंत्रसेनानी शहीद टिपू सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरून व मुस्लिम समाजाविषयीं भडकाऊ भाषण देऊन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात सुरेश चव्हाणके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला
दिनांक 27-11-2022 रविवार रोजी लातूर येथील विर योद्धा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत रांजणकर यांनी हिंदुत्वाची हुंकार सभेचे आयोजन केले होते सदर सभेत सुदर्शन चैनल चे संपादक सुरेश चव्हाणके याने त्यांच्या भाषणात शहीद हजरत टिपू सुलतान यांचा उल्लेख शैतान असा करून व मुस्लिम समाजाविषयी अपशब्द वापरून सभेत भडकाऊ भाषणाद्वारे हिंदू मुस्लिम दंगे भडकवण्याच्या उद्देशाने सभेला संबोधित केले लातूर जिल्हा समस्त देशांमध्ये शांतता प्रिय व कायद्याचे पालन करणारे शिस्तप्रिय जिल्हा म्हणून परिचित आहे परंतु अशा सुरेश चव्हाण सारख्या व्यक्तीच्या भडकाऊ भाषणाद्वारे समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत सदरील घटना घडून तब्बल आठ दिवस होऊन अनेक निवेदने देऊनही अद्याप संबंधितांवर कसलीच कारवाई केलेली नाही जिल्ह्यातील हिंदू व मुस्लिम बांधवात सर्वधर्म समभावाचे सामाजिक ऐक्याचे संबंध आहेत सदर भाषणाद्वारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे जातीय तेड व दंगली घडविण्याचा प्रयत्न करण्याचा कट करणाऱ्या वीर योद्धा संघटनेचा संस्थापक श्रीकांत रांजणकर व सुदर्शन चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्याविरुद्ध तात्काळ योग्य ती कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून अशा जातीय तेढ निर्माण करण्याच्या घटनांना आळा बसेल अशा मागणीचे निवेदन शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले असून सदरील घटनेचा निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुरेश चव्हाण यांच्या प्रतिमेस प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारून करण्यात आला व सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या.
सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, तालुका अध्यक्ष सबदर कादरी, शहराध्यक्ष बाबा बिबराळे,हिरा कादरी, उमर फारुख औसेकर,समीर खुरेशी, मुजम्मील शेख, खडके रब्बानी, सोहेल खादीम, काझी मोईज, उमर सय्यद, मुन्ना शेख, रवी चौधरी, आवेस कादरी, इस्माईल खुरेशी, युनूस खान, जाधव सुमित, बिबराळे साजिद, बाबा शेख, शेख माजिद रजा, वाजीद शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत