• Mon. May 5th, 2025

लोकसभेसाठी ठाकरे गटाची घोडदौड, आतापर्यंत 11 उमेदवारांवर जवळपास शिक्कामोर्तब

Byjantaadmin

Feb 8, 2024

मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणुकीसंबंधी जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकरे शिवसेना ठाकरे गटाने आपले 11 उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) , तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत (Arvind Sawant) यांचं नाव अंतिम करण्यात आलं असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत मधून AURANGAB SAMBHAJINAGAR चंद्रकांत खैरे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे. 

ठाकरे गटाने आतापर्यंत शिक्कामोर्तब केलेले लोकसभा उमदेवार 

– शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
– बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
– ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
– RAIGAD – अनंत गीते
– RATNAGIRI -सिंधुदुर्ग – विनायक राऊत
– दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
– वायव्यMUMBAI – अमोल कीर्तीकर
– संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
– धाराशिव – ओमराजे निंबाळकर
– परभणी – संजय जाधव
– THANE – राजन विचारे

आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने ठरवलं आहे. त्यासाठी जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने 48 पैकी 23 जागांची मागणी केली आहे. 

या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाकडून 11 जागांवर नावं फायनल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभेसाठी ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचं दिसून येतंय.

ठाण्यातून राजन विचारे लढणार

शिवसेनेत झालेल्या बंडाचं मूळ ठाण्यात असून ठाणे हा EKNATH SHINDE यांचा बालेकिल्ला असल्याचं मानलं जातंय. त्या ठिकाणाहून खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात येणार असून त्यांनी तयारीही सुरू केली आहे. 

छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनेकजण उत्सुक होते. त्यामध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील उत्सुक असल्याचं समोर आलं होतं. पण ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आलं आहे. चंद्रकांत खैरे यांना गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. 

बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर लढणार

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात (Buldhana Lok Sabha Election 2024) शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे  जिल्हा संपर्कप्रमुख  नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना लोकसभेचे तिकीट दिलं जाणार आहे.  

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 21 आणि 22 फेब्रुवारीला BULDHANA लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते नरेंद्र खेडेकर यांच्या अधिकृत  उमेदवारीची घोषणा करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *