• Wed. Jun 18th, 2025

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आ.धिरज देशमुख व सौ. दीपशिखा देशमुख यांच्याकडून कौतुक

Byjantaadmin

Feb 6, 2024

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आ.धिरज देशमुख व सौ. दीपशिखा देशमुख यांच्याकडून कौतुक, विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळेपणाने संवाद

लातूर:– वाचनाची आवड निर्माण होऊन त्या माध्यमातून चांगले व्यक्तिमत्व घडावे या हेतूने “रीड लातूर” उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात शहर व ग्रामीण मधील काही शाळां मधील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचणासाठी दिली आहेत.या पुस्तकांचा वापर मोठ्या प्रमाणात  संबंधित विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.रीड लातूर उपक्रमांतर्गत नुकतेच काही लहान विद्यार्थ्यांशी आमदार धिरज विलासराव देशमुख व सौ दीपशिखाताई धिरज देशमुख यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.या संवादा दरम्यान विद्यार्थ्यांनी आपणास चांगले शिक्षण घेऊन काय बनायचे आहे, आपणास कोणता खेळ आवडतो, अभ्यासाशिवाय इतर काय छंद आहेत याविषयी माहिती दिली. यावेळी कु.अदिती बादाडे या विद्यार्थिनीने रेखाटलेली  चित्रे सौ.दीपशिखाताई देशमुख व आमदार धिरज  देशमुख यांना दाखवली तसेच तिने स्वतः लिहिलेल्या कथा देखील वाचून दाखवल्या.यावेळी कु.वर्तिका सुळ या विद्यार्थिनीने पर्यावरणाविषयी लिहिलेली कविता व लेख वाचून दाखवला,कु.अदिती चव्हाण या विद्यार्थिनीने स्वलिखित कविता सादर केली. चि.स्वरूप नागापुरे या विद्यार्थ्याने राष्ट्रपुरुषांच्या चारित्र्यातून आपण काय घ्यावे याविषयी प्रभावीपणे भाषण केले, कु.आर्या पाटील या विद्यार्थिनीने श्रीकृष्णा विषयीचा संवाद सादर केला. यावेळी चि.वंश दीपशिखा धिरज देशमुख,कु.दिवीयाना दीपशिखा धिरज देशमुख, कु.वर्तीका राहूल सुळ, ओजस्वी राहुल सूळ, अमृता व्यंकटेश निंबाळकर (घार), कु.अदिती गणेश चव्हाण, कु.पहल बालाजी पिचारे, अदिती अभिजीत बादाडे, कु.आर्या प्रवीण पाटील, शेख दानिश मुबीन, गायत्री  राजकुमार पाटील, श्रावणी राजकुमार पाटील, गौरव संदीप देशमुख,शांभवी लोमटे, इशिता सुपर्ण जगताप, श्रीवर्धन शिवराज बाजुळगे, यशवर्धन शिवराज बाजूळगे,अनुष्का हरिश्चंद्र चौधरी, काव्या हरिश्चंद्र चौधरी, आयुषा आनंद पवार, अस्मी आनंद पवार, स्वरूप शिवलिंग नागापुरे, सत्यजित मोरे  विद्यार्थ्यांचे पालक व रीड लातूरचे समन्वयक  राजू सी पाटील  आदींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *