वलांडी येथील घटनेचा मुस्लीम समाजाच्या वतीने तिव्र निषेध
वलांडी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार व लैंगिक अत्याचाराचा घटनेचा निलंगा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त केला असून सदरील घटनेतील आरोपी वर कडक कारवाई करावी जेणेकरून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. या बाबतचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी निलंगा याना देण्यात आले. घटनेच्या निषेधार्थ जो उद्या निलंगा बंद चे आवाहन करण्यात आले आहे. त्या बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. निलंगा शहरातील सर्वाना अशी विनंती करण्यात येत की बंद ला सहकार्य करावे शांततापूर्ण मार्गाने निषेध व्यक्त करावा.

