निलंगा -येथील महाराष्ट्र महाविद्यालयात दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी सायन्स असोसिएशन आणि रसायनशास्त्र विभाग यांच्यातर्फे बीएसईतील सर्व विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. एम. के. पाटील हे उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी “करियर ऑपॉर्च्युनिटीस आफ्टर बीएससी”(Career opportunities after B.Sc) या विषयावर तसेच पदवीनंतर उच्च शिक्षणासाठी भारतामधील विविध नावाजलेल्या शासकीय उच्च शिक्षण संस्था IIT, IISER, NIT, IISC आणि केंद्रीय विद्यापीठ मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींवर योग्य व सखोल मार्गदर्शन केले त्याचबरोबर रसायनशास्त्र मधील NMR स्पेक्ट्रोस्कोपी हा क्लिष्ट विषय विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत अवगत करून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके हे उपस्थित होते. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी तसेच विज्ञान विभागातील प्रमुख डॉ. धनंजय जाधव, डॉ. भगवान वाघमारे, डॉ. चंद्रकुमार कदम, डॉ. सचिन बसुदे व प्रा. रामेश हिरेमठ तसेच प्रा. सुरेश कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका रेवते व आफताब पटेल यांनी केले त्याचबरोबर आभार साक्षी कठारकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वाकळे, सिद्धू कुंभार आणि खांडेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
