• Tue. Apr 29th, 2025

राज्यासह मराठवाड्यातील एकही मराठा सगेसोयरेच्या कायद्यामुळं आरक्षणापासून वंचित राहणार नाही : मनोज जरांगे

Byjantaadmin

Jan 30, 2024

रायगड : मनोज जरांगे यांनी रायगडावर आल्यावर एक उर्जा मिळते, असं म्हटलं. मराठा समाजासाठी ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयरे म्हणून अध्यादेश झाला आहे, त्याचा कायदा होणार आहे, असं जरांगे म्हणाले. रायगडासारखं मोठं दैवत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. यापुढं देखील लढाई लढणार आहोत आणि जिकणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या सर्वेक्षणातील त्रुटींबाबत प्रश्न विचारलं असता त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.मराठा समजाला मागास सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असं जरांगेंनी म्हटलं. मला सर्वेक्षणाबाबतची माहिती नाही त्यामुळं अधिक माहिती घेईन, ज्यामधील माहिती नाही त्याबाबत बोलणार नाही, असं जरांगे म्हणाले.

गेल्या ७० वर्षात झाला नाही तो मराठा समाजासाठी कायदा बनला आहे. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगेसोयरे कायदा झालेला आहे. महाराष्ट्रातील एकही मराठा ओबीसीत जाण्यापासून वंचित राहणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांची पोरं मुंबईला शांततेत गेली आणि शांततेत आरक्षण घेऊन आले आहेत, असं जरांगे म्हणाले. मराठ्यांच्या पोरांनी कायदा आणला आहे त्यामुळं दिवाळी साजरी केली आहे. त्या कायद्यानंतर पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महादिवाळी करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा आहे, तो सुटला की धनगर आरक्षण आणि मुस्लीम आरक्षण कसं मिळत नाही ते बघतो. धनगर बांधवांनी आणि मुस्लीम बांधवांनी आरक्षण पाहिजे असं म्हटलं की मग मी बघतो, असं जरागेंनी म्हटलं.गन भुजबळ हे राजकारणी असून त्यांना ओबीसी बांधव ओळखतात, असं मनोज जरांगे म्हणाले. सरकार छगन भुजबळ यांना घाबरत नाही, असंही जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सत्याच्या बाजूनं आहेत. छगन भुजबळ यांच्या मागं राहावं लागेल, त्यांना सोडणार नाही. राजकीय नेत्यांशी आम्ही संघर्ष संपवलेला आहे. आमच्या जातीसाठी आम्हाला भांडणं आवश्यक आहे, असं जरांगे म्हणाले. सगेसोयरेच्या कायद्यामुळं महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणाबाहेर राहणार नाही, मराठवाड्यातील देखील एकही मराठा आरक्षणाबाहेर राहणार नाही, असं जरांगे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed