• Tue. Apr 29th, 2025

धाराशिव की उस्मानाबाद ? निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ उत्तर

Byjantaadmin

Jan 29, 2024

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आता धाराशिव लोकसभा, विधानसभा मतदारसंघाचे नाव उस्मानाबाद असेच राहणार आहे. परीसिमन आयोगाच्या नियमानुसार 2026 नंतर जनगणना होणार आहे. त्यामुळे त्यानंतर मतदारसंघ नाव आणि पुनर्रचना होणार आहे. नाव बदलण्याबाबत त्या पत्राला अनुसरून केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी उत्तर दिले आहे.

परिसीमन आयोगाच्या नियमानुसार 2026 नंतर जनगणना होणार असून त्यानंतर मतदारसंघ नाव आणि पुनर्रचना होणार आहे. 2026 पर्यंत उस्मानाबाद नाव मतदार संघाला राहणार आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव 28 नोव्हेंबर 2023 रोजी निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्या पत्राला अनुसरून केंद्रीय निवडणूक आयोगान सोमवारी उत्तर दिले आहे. त्यामुळे येत्या काळात उस्मानाबाद हेच नाव ठेवावे लागणार असल्याने राजकीय पुढारी पक्ष आणि प्रशासनाची आता येत्या काळात अडचण होणार आहे.जिल्हा प्रशासनाने आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबादऐवजी धाराशिव नावाने तयारी केली होती. आता उस्मानाबाद हे नाव देऊन कंसात धाराशिव नावाचा उल्लेख ठेवावे लागणार आहे. त्यामुळे आता यासाठी प्रशासनाला कसरत कारवाई लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर, धारशिव नामांतर

दरम्यान, 2023 पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धारशिव करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर करून घेण्यात आला. यानंतर हा ठराव भारत सरकारच्या गृहविभागाला पाठवला गेला. गृहविभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर फेब्रुवारी 2023 साली या दोन्ही शहरांच्या नामांतरावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed