• Tue. Apr 29th, 2025

फसगत होऊ द्या नाहीतर काहीही होऊ द्या, मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी खंबीर – जरांगे

Byjantaadmin

Jan 29, 2024

बीड: मराठा आरक्षणासाठी सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण संपवले. दरम्यान आता त्यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. बीडमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. आता फसगत होऊ द्या नाहीतर काहीही होऊ द्या, मात्र मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी खंबीर आहे, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले आहे.

ते म्हणाले की, आमची फसगत होऊ द्या, नाहीतर काहीही होऊ द्या.. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी खंबीर आहे. पुन्हा आरक्षण मिळवून देईन, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी हरिभाऊ राठोड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर जर मराठा आरक्षणाला धोका झाला, तर मी मंडल कमिशनला चॅलेंज करेन, असं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारसह छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. ते बीडच्या नारायणगड येथे दर्शनासाठी आले असता मीडियाशी बोलत होते.

कायदा बनलाय, जवळपास आरक्षण मिळालंय, मराठे जिंकून आलेत : मनोज जरांगे पाटील


यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाला काही दगा फटका झाला तर मंडल कमिशन मी चॅलेंज करणार आहे. पण जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत त्यांनी किती चॅलेंज करून द्या, मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल. या कायद्याचं काय करायचे करू द्या, कधीही मनोज जरांगे मागे हटणार नाही. त्याचबरोबर मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed