पंढरी भंडारे आणि श्री नंदू भंडारे बंधू च्या आकर्षक कॅलेंडरचे कौतूक
लातूर -औराद शहाजनी येथील पंढरी भंडारे आणि श्री नंदू भंडारे हे बंधू मागच्या ११ वर्षापासून माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या छायाचित्रासह वार्षिक कॅलेंडर प्रकाशित करतात. यावर्षी माझा विठ्ठल हे कॅप्शन देऊन काढलेले आकर्षक कॅलेंडर त्यांनी बाभळगाव निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना भेट दिले. यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी कॅलेंडर प्रकाशित केल्याबद्दल भंडारे बंधूंचे यावेळी कौतुक करून त्यांचे आभारीही मानले.
