वीरशैव तेली समाजाच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम
लातूर ः मकरसंक्रांतीनिमित्त वीरशैव तेली समाज लातूर, महिला मंडळाच्या वतीने हळदी – कुंकवाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 26) उत्साहात पार पडला. वीरशैव सांस्कृतिक भवन येथे आयोजित या कार्यक्रमास समाजातील ज्येष्ठ महिला चंद्रकला कलशेट्टी, छायाताई चिंदे, छायाताई शेगांवकर, सुमन राऊत, शोभा लोखंडे, महानंदा देशमाने, जयश्री राऊत, तारामती राऊत, सविता ठेले, कुसुम भोसेकर, कमल व्यवहारे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. कुसुम पुदाले व महिला समिती सदस्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने दीपाली राजपूत यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व महिलांना सांगून ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने ४०० फुलांचे रोपटे वाण म्हणून भेट देण्यात आले. जान्हवी राऊत हिने प्रभू श्री रामचंद्र यांच्यावरील उत्कृष्ट गीत सादर केले. या कार्यक्रमाची महिला मंडळाने नियोजनबद्ध व काटेकोरपणे कार्यक्रमाची आखणी केली. कार्यक्रमस्थळी अनुसया देशमाने, जयश्री बंगले यांनी तयार केलेल्या देवीच्या मूर्तीची आकर्षक सजावट केल्याने ही मूर्ती कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण केंद्र बनली होती. वर्षा चोपडे, सोनाली होकळे, ज्योती गंगणे, प्रियांका महेंद्रगीकर, पूजा शेगांवकर यांनी काढलेली सुबक आणि सुंदर रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकू,नाश्ता व वाण देण्याची जबाबदारी प्राजक्ता लोखंडे, अश्विनी लोखंडे, माया कलशेट्टी, सुरेखा संजय कलशेट्टी, रोहिणी कलशेट्टी, मेघा भुजबळ, विजयमाला उदगीरे, मीनाक्षी राऊत, मनीषा भुजबळ, रेखा कलशेट्टी, रागिणी लोखंडे, जयश्री बंगले, अनुसया देशमाने, शुभांगी राऊत, वनिता व्यवहारे यांनी पार पडली. अंजली क्षीरसागर, सारिका क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमस्थळी नाव नोंदणीसाठी वैशाली देशमाने, ज्योती फेसगाळे, संगीता उदगीरे, उषा टाकणे, विद्या टाकणे, आश्विनी धुमाळे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमासाठी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वीरशैव तेली समाज लातूरचे अध्यक्ष, ज्येष्ठ सल्लागार व संचालक मंडळाने महत्त्वाचे योगदान दिले.
