लातूरहून अजमेरसाठी रेल्वे सोडा
लातूर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी केली रेल्वे मंत्री यांच्याकडे मागणी
लातूर: लातूर , धाराशिव व सीमा भागातील मुस्लिम व हिंदू भक्तगण मोठ्या प्रमाणात आहेत. दोन्ही जिल्हयातील मुस्लिम बांधवांनी लातूर ते अजमेर रेल्वे सोडण्यात यावी अशी मागणी रेल्वे मंत्री अश्विनी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या भागातील नागरिकांना अजमेरला जाण्यासाठी रिझर्वेशन करून महिना दोन महिने वेटिंग राहावे लागत आहे नागरिकांना नांदेड सोलापूर दादर रेल्वे स्थानकातून अजमेरला जावे लागत आहे नागरिकांची गैरसोय होत आहे रेल्वेमंत्री महोदयाने तात्काळ दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निलंगा, उमरगा,शिरूर अनंतपाळ, देवणी, उदगीर, लोहार ,आदी तालुक्यातील नागरिकांची खुप दिवसापासून मागणी आहे
