निलंगा(प्रतिनिधी):-दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर उमरगा हा.येथिल खोरेश्वर मंदिर परिसर (खोरीतला महादेव) येथे वारकरी संस्कार धाम गुरुकुलचे समाजसेवक तथा आरोग्यदूत डाॅ.अरविंद भातांब्रे यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
वारकरी संस्कार धाम गुरुकुल हे गेल्या दिड वर्षांपासून संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी निलंगा परिसरात कार्यान्वित आहे. गुरुकुल चे अधिपती ह.भ.प. समाधान महाराज उमरगेकर उच्चशिक्षित असून त्यांनी मोठ्या संघर्षातून १ जून २०२२ साली गुरुकुल ची स्थापना केली.तेव्हापासून गुरुकुल निलंगा शहरातच भाडेतत्त्वावर चालविले जाते. कथा व कीर्तनाच्या मानधनातून ही गुरुकुलची वास्तु उभारत असल्याचे महाराज प्रास्ताविकात बोलताना व्यक्त झाले. उत्तम दर्जाचे शिक्षित वारकरी घडवित असलेल्या या गुरुकुलला समाजाच्या मदतीची गरज आहे. असे मत कवी माधव लांडगे यांनी मांडले . वारकरी विचार आणि वारकरी संस्कार ही काळाची गरज आहे . असे गुरुकुल उभारले पाहीजेत. आम्ही शारिरीक आरोग्य सांभाळतो तर या गुरुकुलातून घडणारी आध्यात्मिक पिढी ही समाजाचे मानसिक आरोग्य सांभाळणारी असेल असे डाॅ.अरविंद भातांब्रे बोलताना म्हणाले .तर कार्यक्रमाचे आभार ह.भ.प.वसंत महाराज जाधव यांनी मांडले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीधरजी धुमाळ, वारकरी साहित्य परिषद ता अध्यक्ष नामदेव सिरसल्ले,परमेश्वर शिंदे,अमोल रावजादे,सिनेअभिनेते सतिश रावजादे पत्रकार परमेश्वर शिंदे सुधीर नाना रामदासी मिरकले,दत्ता राठोड ,राजाराम जाधव ,चंदर लोभे ,गावातील नागरिक व गुरुकुलचे सर्व पालक उपस्थित होते.यावेळी दत्ता राठोडे,राम थोरमोठे,लक्ष्मण वाडीकर, ऋषी लोभे,जनार्दन वाडीकर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली.
