लातूर : महाराष्ट्र महिला वकील परिषदेच्या वतीने नव्याने सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या महिला वकिलांचा सत्कार तसेच सेवानिवृत्त झालेल्या अतिरिक्त महिला सरकारी वकिल एड. बबिता संकाये यांचा निरोप समारंभ नुकताच जिल्हा न्यायालयाच्या वकील कक्षात पार पडला.
या कार्यक्रमात एड. जयश्रीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्याने सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेल्या एड. हर्षदा जोशी, एड. वैशाली खंडागळे, एड. मीरा राज चवडे, एड. सारिका वायबसे, एड. विजयश्री पाटील, एड. मीरा कोंडमगिरे यांचा शाल – पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर अतिरिक्त सरकारी वकील म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एड. बबिता संकाये यांना यावेळी निरोप देण्यात आला. याप्रसंगी एड. बबिता संकाये यांनी सरकारी वकील म्हणून काम करताना आपल्याला आलेले अनुभव उपस्थित महिला वकिलांना सांगितले. नूतन महिला सरकारी वकिलांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आपण या माध्यमातून गरजूंची सेवा करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. एड. जयश्रीताई पाटील यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात महिला सरकारी वकिलांनी समाजातील दीनदुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी एड. किरण चिंते, एड. संगीता ढगे , एड. नयना देवताळकर ,एड. सुरेख जानते, एड. शोभा गोमारे, एड. उमादेवी हाळीकर , एड. वसुधा नालापुरे ,एड. लता कराड, एड. सुरेखा शृंगारे ,एड. अरुणा वाघमारे, एड. गायत्री नल्ले , एड. चारुशिला पाटील, एड. सोफिया शेख, एड. प्रतिभा कुलकर्णी, एड. सपना बोरा, एड. प्रतिभा शेळके,एड. प्रिया चव्हाण, एड. सुरेखा बेलुरे , एड. माया तादलापुरे ,एड. सुजाता खोबरे, एड. सरिता कांबळे आदींची उपस्थिती होती.
