• Wed. Apr 30th, 2025

फिनिक्स फाउंडेशन लोदगा, लातूर यांच्या वतीने बांबू लागवड प्रोत्साहन कार्यक्रमाचे आयोजन

Byjantaadmin

Jan 25, 2024

फिनिक्स फाउंडेशन लोदगा, लातूर आणि गोदरेज एसटेक या संस्थेमार्फत दि.20.01.2024 ते 30.01.2024 दरम्यान राबवण्यात येणाऱ्या बांबू लागवड प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत आज दि.25.01.2024 रोजी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम लोदगा येथे पार पडला.या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी बांबू तज्ञ श्री. संजीव करपे यांनी उपस्थित राहून सादरीकरण केले, व शेतकऱ्यांना बांबूपासून जागतिक स्तरावर तसेच आपल्या देशात होणाऱ्या विविध प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.महाराष्ट्र शासनाद्वारे मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 7 लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून या योजनेचा लाभ घेऊन शेतकर्यांनी बांबूची लागवड करावी असे आव्हान या प्रसंगी शेतकऱ्यांना करण्यात आले.या प्रशिक्षणात फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने डॉ.शिर्गापुरे यांनी बांबू लागवडीबाबत सविस्तर माहिती देवून बांबू लागवड व उत्पादन पर्यंत घ्यायची दक्षता या संदर्भात सविस्तर सादरीकरण केले.राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री वातावरणीय बदल व बांबू लागवड टास्क फोर्स चे सदस्य पाशा पटेल यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात व देशात बांबू लागवड संबंधी सुरू असलेल्या विविध परियोजनांची माहिती या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आली. अश्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आले. या वेळी फिनिक्स फाऊंडेशन चे समन्वयक डॉ. परवेज पाशा पटेल व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *