• Wed. Apr 30th, 2025

डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना लातुर जिल्हा अध्यक्षपदी हरूण सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष पदी मोईज सितारी यांची निवड

Byjantaadmin

Jan 25, 2024

लातूर : डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना लातुर् जिल्हा अध्यक्षपदी हरूण सय्यद यांची निवड.करण्यात आली आहे.डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे दुसरे अधिवेशन दिनांक २८ आणि २९ जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कणेरीमठ येथे  होत आहे. या निमित्ताने राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातील डिजिटलं मीडिया क्षेत्रात काम करणारे पत्रकार या अधिवेशनास मोठ्या सखेने जात आहेत.

या निमित्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणी राज्य संघटक संजय जेवरीकर यांच्या मार्गदर्शनात लातूर जिल्हा कार्यकारिणीची नव्याने बांधनी करण्यात आली असून लातूर जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष म्हणून हरून सय्यद यांची निवड करण्यात आली.लातूर येथील शसकीय विश्रामग्रह येथे आयोजित बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली असून बैठकीला मराठवाड कार्याध्यक्ष दिपरत्न निलंगेकर यांची उपस्थिती होती.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष पदी मोईज सितारी, उपाध्यक्ष विजयकुमार देशमुख ,सचिव साजिद पटेल , ,सह कार्याध्यक्ष सलार शेख,संघटक सिद्धनाथ माने , कोषाध्यक्ष बसवेश्वर डावळे,जील्हा संपर्क प्रमुख अफसर शेख, संगमेश्वर करंजे प्रसिद्धी प्रमुख, सहसचिव मंगेश सूर्यवंशी , सहसंघटक बालाजी कांबळे 

, सदस्य संतोष माने यांची निवड जिल्हा कार्यकारिणीवर करण्यात आलीय. बैठकीत दिनांक २८ आणि २९ जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कणेरीमठ येथे  होत असेल्या दुसऱ्या राज्य अधिवेशनास मोठ्यासखेने जाण्याचा संकल्प उपस्थितानि केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *