माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची
नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी घेतली भेट
लातूर दि. २५ जानेवारी २०२४ राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी बाभळगाव निवासस्थानी भेट घेतली. आमदार अमित देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांच्या समवेत झालेल्या चर्चेदरम्यान लातूर गाव भागात उभारण्यात येत असलेले १०० खाटाचे रुग्णालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना यासह वैद्यकीय महाविद्यालय परिसरात सुरू असलेली इतर बांधकामे आणि
