शंखी गोगलगाय व अतिवृष्टी च्या मदतीपासुन वगळल्याने अंबुलगा(बु) मोड निलंगा -उदगीर रोड येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा रास्ता रोको
निलंगा:-शंखी गोगलगाय व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले बाबत,नुकसान भरपाई चा पंचनामा करुनही नुकसान भरपाई योजनेमधून अंबुलगा (बुं), निटुर, औराद, हलगरा हे महसूल वगळण्यात आल्यामुळे माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली अंबुलगा (बु) मोड येथे हजारोंच्या संख्येने रास्ता रोको करण्यात आला.
लातुर जिल्ह्यातील भाजपाचे आमदार सरकार असुनही शेतकरी वर्गास मदत आणण्यात अपयशी ठरले आहेत भाजपाच्या शेतकरी विरोधी धोरणामुंळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे असे प्रतिपादन पंडितराव धुमाळ यांनी केले. यावेळी जवळपासच्या सर्व खेड्यापाड्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला होता. यावेळी राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अंगद जाधव, विधानसभा कार्याध्यक्ष संदिप मोरे, युवकचे जिल्हा चिटणीस सुग्रीव सूर्यवंशी, महिला जिल्हा उपाध्यक्षा महादेवीताई पाटिल, जिल्हा सरचिटणीस कोमलताई देशपांडे, संगिताताई कदम, ओबीसी चे तालुकाध्यक्ष मोरे साहेब,राजु सूर्यवंशी,विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष रोहित पाटिल अंबुलगा (बुं) चे राष्ट्रवादी शाखा प्रमुख मा.श्री.बाळासाहेब बिरादार, महावीर काकडे , नवनाथ खटके,आनंद शिंदे युवक जिल्हा सरचिटणीस उद्धव मेकाले
युवक कार्याध्यक्ष महेश चव्हाण,
किसनराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव शिंदे ,संतोष बिरादार ,सचीन देशमुख, जयदीप शिंदे बिरादार , शिवाजी शिंदे गुंडेराव पाटील भास्कर देशमुख किसन शिंदे अनेक ग्रामस्थांनी व शेतकरी तसेच राष्ट्रवादी चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अंबुलगा (बु) निलंगा -उदगीर रोडवरील रस्ता रोको मध्ये प्रशासनाकडुन मंडळ अधिकारी, तलाठी,पोलीस प्रशासन यांच्यावतीन पोलीस निरीक्षक शेजाळ , पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी निवेदन स्विकारले.