महाराष्ट्र महाविद्यालयातील विद्यार्थी सदानंदे याची पुढील शिक्षणासाठी NIT हिमाचल प्रदेश येथे प्रवेश.
निलंगा:-भारतामध्ये दरवर्षी बी.एस्सी नंतर नामांकित संस्था जसे कि आयआयटी,सीएमआय, एनआयटी, केंद्रीय विद्यापीठे इत्यादीमध्ये एम.एस्सी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर JAM (Joint Admission Test for Masters) ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.
महाराष्ट्र महाविद्यालय येथील गणित विभागातील बी.एस्सी 2021-22 या वर्षातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी अमरदीप सदानंदे याने JAM ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी NIT (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजि) हमीरपूर, हिमाचल प्रदेश या प्रतिष्ठित संस्थेमध्ये मॅथेमॅटिक्स अँड कॉम्पुटिंग सायन्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. तसेच बालाजी सोळुंके याने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, ओमकार जाधव याने एम आय टी आळंदी, पुणे, विजय पाकनाटे याने डी. वाय. पाटील कॉलेज, पिंपरी चिंचवड पुणे, या सर्व विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रियल मॅथेमॅटिक्स साठी प्रवेश घेतला आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्ष विजयकुमार पाटील, प्राचार्य डॉ. एम एन.कोळपुके, गणित विभागातील प्रा.डॉ. सचिन पां. बसुदे, प्रा. भाग्यश्री मंगरूळकर, प्रा. शारदा सोळुंके तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.