• Wed. Apr 30th, 2025

लोकशाही टिकण्यासाठी पहिजे ती किंमत आम्ही मोजू, कितीही अडचणी आल्या तरी एकत्र राहावं लागेल : शरद पवार

Byjantaadmin

Jan 22, 2024

मुंबई : ‘सध्या देशात धार्मिक धुव्रीकरण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मधू दंडवते यांनी दाखविलेल्या सर्वसमावेशक लोकशाही मार्गावर चालताना कितीही अडचणींना सामाना करावा लागला, तरी आपल्याला एकत्र रहावे लागले,’ असे अधोरेखित करतानाच, ‘आता आपले मतभेत विसरून एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांनी रविवारी मुंबईत केले. त्याच वेळी, ‘राम हा व्यक्ती, जाती, धर्मांचा नसून तो सर्वांचा आहे,’ असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले.

लोकशाहीवर झालेला हल्ला जनता खपवून घेणार नाही. लोकशाही टिकण्यासाठी पहिजे ती किंमत आम्ही मोजू .जनता हुशार असते तिला फार काळ फसवता येत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं.

फारुख अब्दुला म्हणाले, ‘कोणताच धर्म संकटात नसून, तसे खोटे पसरवण्यात येत आहे. पक्ष सत्तेत असताना योग्य न्यायाधीश नेमले असते, ईव्हीएम मशीन आणल्या नसत्या, त्याचबरोबर निवडणूक आयोगही मजबूत केला असता, तर आज ही वेळ आली नसती.’प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सभेत शरद पवार, फारुख अब्दुला यांनी वरील प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख होते. या वेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार कुमार केतकर, कर्नाटकचे मंत्री बी. आर. पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *