निलंगा- निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा,देवणी अनंतपाळ,या तिन्ही तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकरावजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाई नगराळेउपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,मोइज शेख सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस कर्मयोगी स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व विकासरत्न स्व.विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी विचार पिठावर उपस्थित प्रदेश सचिव अभय साळुंके, तालुकाध्यक्ष विजय पाटील,आबासाहेब पाटील,अजित बेळकुने,अजित माने,हमीद शेख,सुरेंद्र धुमाळ, पंकज शेळके,इ.आपले मनोगत व्यक्त केले.विचारपिठावर निलंग्याच्या मा.नगराध्यक्ष सुनीताताई चोपणे,प्रा.राजेंद्र सूर्यवंशी,शहराध्यक्ष अजित नाईकवाडे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,बालाजी वळसांगवीकर,वैजनाथ लुल्ले, लाला पटेल,संजय बिराजदार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस गजानन भोपणीकर,उपनगराध्यक्ष अमित मानकरी,मा.शहराध्यक्ष मोहम्मदखान पठाण उपस्थित होते.तसेच प्रदेश युवक काँग्रेसच्या काढलेल्या न्याय दो.. रोजगार दो या ॲपचे लॉन्चिंग करण्यात आले.मा.श्री.अशोक राव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना अशोकराव पाटील म्हणाले की,सध्या देशात धर्माच्या नावाखाली मताचे राजकारण केले जात असून 2014-19 च्या लोकसभेच्या निवडणुकीत लबाड बोलून मोदी सरकारने जनतेला फसवले आहे.त्याचाच प्रकार आता धर्माच्या नावाखाली पुन्हा एकदा फसवण्याचा प्रकार होत आहे. आता वेळीच सावध झाला पाहिजे.आता जर चूक झाली तर इंग्रजांच्या गुलामीपेक्षा भयंकर वाईट अवस्था या देशाची होईल आज कार्यकर्त्यांमध्ये काही बिनविचारी लोक अफवा पसरवीत आहेत.कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. यापासून आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.तर त्यांच्या सोबतच राहून मी निलंगेकर साहेबांच्या विकासाचा विचार घेऊन पक्ष संघटना मजबूत करून नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकसभेचे 55000 चे मताधिक्य वजा करून 30000 हजाराचे मताधिक्य देणार असे ते म्हणाले.तर भाई नगराळे म्हणाले की,सध्या देशांमध्ये लोकशाही संपवून हुकुमशाही आणण्याचा जो प्रकार चालू आहे तो हाणून पाडण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्षवादी सरकार सत्तेवर आणले पाहिजे. गाव पातळीवर देशाचे नेते राहुल गांधी यांचा नारा मेरा बूथ सबसे मजबूत यासाठी कार्यकर्त्यांना बूथ मजबुतीसाठी जोमाने कामाला लागावे.सध्या देशाला गांधी नेहरू यांच्या विचारांची गरज आहे असे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दयानंद चोपणे आभार देविदास पतंगे यांनी केले.
